Paragandha | परागंदा
- Author: S. V. Ketkar |श्री. व्यं. केतकर
- Product Code: Paragandha | परागंदा
- Availability: In Stock
-
₹240/-
- Ex Tax: ₹240/-
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;
त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले.
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले
-परागंदा
या कादंबरीला जोडमथळा आहे,
"भारतीय समाजाची सरहद्द " हा १९२६ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही मराठी वाचकाला अंतर्मुख करणारी चर्चाप्रधान कादंबरी आहे; कारण तिचा विषय आहे अमेरिकेत स्तलांतरित झालेली भारतीय. केतकरी कादंबरीतील सर्व सीमा-सामर्थ्य या कादंबरीत प्रातिनीधिक स्वरूपात अवतीर्ण झाले आहे.
डॉ. मत्तमयूरीच्या रूपाने लेखकाने येथे वेश्यासंततीचा प्रश्नही हाताळला आहे ;
अशी ही आपल्या समाजाची आणि कादंबरीकाराची सरहद्द अधोरेखित करणारी कादंबरी.
- डॉ. द. भि. कुलकर्णी
Tags: Paragandha | परागंदा