Friedrich Nietzsche : Jeevan Aani Tatvadnyan | फ्रेडरिख नित्शे : जीवन आणि तत्वाद्यान
- Author: Vishwas Patil |विश्वास पाटील
- Product Code: फ्रेडरिख नित्शे: जीवन आणि तत्वाद्यान
- Availability: In Stock
-
₹380/-
- Ex Tax: ₹380/-
विसाव्या शतकातील बौद्धिक वातावरणावर नित्शेइतका प्रभाव अन्य तत्ववेत्यांचा नाही. नित्शेचे हे ऋण जगभरातील सर्वच लेखकांनी मान्य केले आहे. नित्शेच्या विचारांचा प्रभाव अनेक साहित्यिक, कलावंत, मानसशास्त्रज्ञ, समजशास्त्रज्ञ, तत्ववेत्ते यांच्यावर पडला. पुढे त्यांनी आपल्या विचारांनी जग बदलून टाकले.या प्रतिभावंत विचारवंतात वाग्नर, शौपेनहोर, डार्विन, ग्रीक, आल्बेर काम्यू, सार्त्र यांच्या प्रमाणेच अनेक महान व्यक्तींचा उल्लेख करता येईल.
नित्शे ‘ परमेश्वराचा अंत झाला ’म्हणतो. या गोष्टीशी जोडलेल्या गेलेल्या अनेक सामाजिक आणि मानसिक प्रश्नांची चर्चा या पुस्तकात आहे. देव आणि धर्म यासंबंधी त्याचे तत्वज्ञान आणि या निम्मिताने त्याची भूमिका समजून घेता येते. नित्षेचे तर्कशास्त्र, तत्वज्ञान, मानासशास्त्र व विचार या पुस्तकात आहेत. अर्थात हे जाणून घेण्यासाठी त्याचे चरित्रही येथे दिल्यामुळे अभ्याकांची मोठी सोय झाली आहे.
नित्शे हा मूलगामी आणि तात्विक प्रश्न उपस्थित करणारा तत्त्वनेता आहे. नित्शेला अस्तित्ववादी परंपरेचा आद्यप्रवर्तक समजले जाते. त्याला सतावणाऱ्या प्रश्नांची केवळ चर्चा केली नाही तर त्यावर उपायही शोधले.
या महान तत्त्ववेत्याला समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.