• Sahabandha _ Eka Dnyanopasakashi|सहबंध : एका ज्ञानोपासकाशी

Sahabandha _ Eka Dnyanopasakashi|सहबंध : एका ज्ञानोपासकाशी

  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-

कंपनीतली सुस्थिर नोकरी सोडून बेभरवशाच्या प्रकाशन-व्यवसायात उतरण्याचा धोका पत्करलेले अरुण जाखडे यांनी साधारण 1995च्या मध्याला

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याकडे पुस्तकांची प्रकाशनासाठी मागणी केली आणि अण्णांनी ती फार साधेपणानं मान्य केली. तेव्हापासून दोघांमध्ये जो संबंध निर्माण झाला, तो केवळ लेखक-प्रकाशक एवढाच मर्यादित नव्हता. त्याला एक घरगुती गंध होता आणि तो अखेरपर्यंत तसाच राहिला. प्रकाशक म्हणून जाखडे लेखक अण्णांविषयीचा मोठाच आदर मनात बाळगून होते.

त्यांनी अण्णांच्या ग्रंथांवर मनापासून प्रेम केलं. अण्णांनी लिहावं आणि जाखड्यांनी प्रसिद्ध करावं, असा सिलसिला वर्षनवर्षं चालू राहिला. त्यांच्यासाठी प्रकाशक म्हणून हा धन्यतेचा भाग होता, पण त्याहीपलीकडे जाऊन ते माणूस म्हणून अण्णांचे स्नेहभागी झाले होते. 

अण्णा आणि जाखडे या दोघांमधला स्नेहभाव अकृत्रिम तर होताच, पण सर्जकही होता आणि परस्परांना एका अर्थी प्रेरकही ठरला होता.

- अरुणा ढेरे

Write a review

Please login or register to review

Tags: Sahabandha _ Eka Dnyanopasakashi|सहबंध : एका ज्ञानोपासकाशी