• Kalchakra|कालचक्र

Kalchakra|कालचक्र

  • ₹300/-

  • Ex Tax: ₹300/-

सूर्यकांत तिवडे यांची कालचक्र ही कादंबरी परिवर्तनाची भाषा बोलणारी कादंबरी आहे. प्रस्थापित समाजव्यवस्था आणि त्या व्यवस्थेत दाबला जाणारा किंवा दबला जाणारा वर्ग यांचा संघर्ष कादंबरीत ठळकपणे मांडलेला दिसून येतो.
त्या संघर्षात सूर्यकांत तिवडे दाबल्या आणि दबल्या जाणार्या वर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतात, परंतु हे करताना त्यांनी तोल ढळू दिला नाही.

ही कादंबरी पृथ्वीच्या निर्मितीपासून सुरू होते आणि एका गावात संपते. या कादंबरीची भाषा अतिशय वेगवान आहे. या कादंबरीत सतीच्या प्रथेचे वर्णन आहे.
ते मात्र चांगले, मनाला भिडणारे नसून मन पिळवटून टाकणारे आहे. बुद्धिप्रामाण्यवादी, प्रयोगशील, विचारशील, बुद्धिनिष्ठ, बुद्धिजीवी, अहिंसावादी प्रज्ञा-करुणेचे पालन करणारा माणूस निर्माण झाला पाहिजे, असा आशावाद या कादंबरीत व्यक्त केलेला आहे.

विठ्ठल साठे

Write a review

Please login or register to review

Tags: Kalchakra|कालचक्र