Takiche Ghav|टाकीचे घाव
- Product Code: Takiche Ghav|टाकीचे घाव
- Availability: In Stock
-
₹180/-
- Ex Tax: ₹180/-
आयुष्य विलक्षण असतं. ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ हा अनुभव कधीही कुणालाही येऊ शकतो.
त्यांना तर ऊन-पावसाच्या खेळाप्रमाणे हा अनुभव वाट्याला आला होता. जरा कुठं काही चांगलं घडतं असं वाटत असतानाच अपमानानं सन्मानित होण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत होती. कित्येकदा अवहेलना वाट्याला आली. आधी कौतुक करणारी माणसंच त्यांच्या स्वार्थाला अडथळा वाटू लागताच, अचानक नालस्ती करू लागली. अशा परिस्थितीतही ते शांत राहत होते. आयुष्याची अवघी ससेहोलपट होत असतानाही, त्यांना दुःख देणार्यांचेही काही वाईट होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील होते. इतरांना दोष देत नव्हते. कोणावरही राग व्यक्त होऊ नये, आपल्यामुळे दुसर्याला त्रास होऊ नये, यासाठी जपत होते. टाकीचे घाव सोसत होते. स्वतःला शांतपणे घडवत होते.
टाकीचे घाव सोसतानाच्या या वेदनकळाच येथे लेखनकळा होऊन उतरल्या आहेत.
टाकीचे घाव । पुंडलिक गवंडी
Tags: Takiche Ghav|टाकीचे घाव