• Dashavtar Kala Aani Abhyas|दशावतार : कला आणि अभ्यास

Dashavtar Kala Aani Abhyas|दशावतार : कला आणि अभ्यास

  • ₹350/-

  • Ex Tax: ₹350/-

दशावतारी खेळाकडे लोककलेचा एक प्रकार म्हणून पाहिले जाते. विशिष्ट प्रदेशातील ते एक लोकनाट्य! हा प्रकार ग्रामीण लोकसमूहाच्या रंजनासाठी अस्तित्वात आला आणि पुढे लोकरंजनाचा एक प्रकार म्हणून त्याचा विस्तारही होत गेला.

लोकरंजनाच्या या प्रयत्नात आपल्या सभोवताली जे काही सुंदर, मन मोहित करणारे, गुंगवून ठेवणारे असते, ते सारे दशावतारी कलाकार टिपत असतात. आपले भावविश्व कल्पनारम्य जगाशी जोडण्याचा ते सतत प्रयत्न करतात. त्यात मग विविध प्रकारच्या मानवी भावनाही येतात. आपल्या मनातील बर्‍यावाईट विचारांचे द्वंद्व आणि त्यातून उद्भवणारा भावकल्लोळ लोकनाट्यात परावर्तित कसा करता येईल, हा त्यांचा ध्यास!

आपली यासंदर्भातील अनुभूती लोकसमूहाप्रति कशी पोचवावी या विचारातून विजयकुमार फातर्पेकर यांनी प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यातून निर्माण झालेला दशावतारी खेळाचा अभ्यासपूर्ण असा हा विस्तृत आलेख!

Write a review

Please login or register to review

Tags: Dashavtar Kala Aani Abhyas|दशावतार : कला आणि अभ्यास