Patnipuran | पत्नीपुराण

  • ₹180/-

  • Ex Tax: ₹180/-

रवींद्र तांबोळी यांनी रूढी, परंपरांचा शोध घेण्याचा  संकल्प सोडला, तेव्हा त्यांना विविध पुराणांचा धांडोळा घ्यावा लागला. हा धांडोळा घेताना त्यांना अचानक एक दुर्मीळ बाड गवसले, ते म्हणजे ‘पत्नीपुराण’.

ह्या पुराणाचे वेगळेपण म्हणजे निसर्गाच्या ऋतुचक्रातून स्त्रीजीवनाचा घेतलेला शोध. त्यातून स्पष्ट होत असलेले विधिवत विवाहोत्तर सांवत्सरिक वर्तन. प्रत्येक महिन्याचे वैशिष्ट्य वेगळे आणि त्या महिन्यातील व्रत-वैकल्येही वेगळी.

ह्या व्रत-वैकल्याचा वैवाहिक जीवनावर कोणता परिणाम होतो हे सांगणारे हे पुराण वाचक पुन: पुन्हा वाचतील.त्याची पारायणे करतील. भार्यावर्ग संतुष्ट होईल आणि वाचणार्‍यास पुण्य मिळेल हे मात्र नक्की.

ह्या पुराणाची लोकप्रियता पिढ्यान्पिढ्या वृद्धिंगत होईल, असा लेखकाचा होरा आहे, तर काही जाणकारांच्या मते अनेक वाचक हास्यकल्लोळात बुडून जातील किंवा डुबत राहतील.



 

Write a review

Please login or register to review