Pahile Vachan | पहिले वचन

  • ₹750/-

  • Ex Tax: ₹750/-

आशापूर्णादेवी ह्या केवळ बंगालीतीलच नव्हे तर भारतीय साहित्यातील श्रेष्ठ आणि महत्त्वाच्या लेखिका आहेत.


‘पहिले वचन’ हा त्यांच्या ‘प्रथम प्रतिश्रुती’ ह्या कादंबरीचा अनुवाद आहे. ह्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

‘पहिले वचन’ ही कादंबरीची नायिका सत्यवतीची लढाई आहे, जी समाजाने ग्राह्य धरलेल्या रूढीविरुद्ध उभी राहते. 


तत्कालीनच नव्हे, तर आजही स्त्रीचे मन ज्याप्रकारे बाह्यजगाशी आणि स्वतःशीच संघर्ष करत राहते, अन् विद्रोही रूप धारण करून सामाजिक चौकट बदलण्याचा प्रयत्न करते, त्याचीच ही प्रातिनिधिक कादंबरी आहे.

रूढिग्रस्त निम्न मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातील अडचणींसहित जगतानाच व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणे, हे अवघड काम सत्यवती करते. मनस्वी स्त्रीचा हा संघर्ष एक मोठे रूप धारण करतो. एका अर्थाने तो स्त्रीमुक्तीचा हुंकारच आहे.

आशापूर्णादेवींनी तत्कालीन स्त्रीजीवन अतिशय उत्कटतेने व प्रतिभेने चित्रित केले आहे. नायिकेच्या माध्यमातून त्यांनी आजच्याही स्त्रियांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्याची प्रतिज्ञाच दिली आहे. 

Write a review

Please login or register to review

Tags: Pahile Vachan | पहिले वचन