Vegali Mati, Vegala Vas | वेगळी माती, वेगळा वास

  • ₹260/-

  • Ex Tax: ₹260/-


प्रवासाची आवड माणसाच्या रक्तातच असते का?
की ती नंतर हळुहळू निर्माण होत जाते?
सवयीच्या झालेल्या गोष्टींपासून ते दूर पळणं असतं की
स्वत:मधलं चैतन्य टिकवणार्‍या रसदीची कोठारं
शोधणं असतं? मग तो प्रवास भौगोलिक असो,
की काळात किंवा इतिहास-परंपरेत केलेला प्रवास असो;
पुष्कळदा वर्तमानातल्या भौगोलिक प्रवासात हे
इतर प्रवास गुंतलेलेच असतात. कारण आपली भूमी
आजच्या माणसांबरोबरच प्राचीन माणसांचं जगणंही जपते आहे.
त्यामुळेच प्रवास करताना आपलं देशाचं आणि
काळाचं भान तर वाढतंच पण माणसाविषयी जाणून घेण्याचं
आपलं कुतूहलही न शमता वाढतच राहतं.
आणि वाढण्याचा अनुभव नेहमीच आपल्याला नैसर्गिकपणे हवासा असतो. 
म्हणून मग प्रवासही हवाच असतो.

Write a review

Please login or register to review

Tags: Vegali Mati, Vegala Vas | वेगळी माती, वेगळा वास