Pardhi Samaj : Lokjeevan Aani Loksanskruti | पारधी समाज : लोकजीवन आणि लोकसंस्कृती
- Author: Dr. Balasaheb Bale | डॉ. बाळासाहेब बळे
- Product Code: Pardhi Samaj : Lokjeevan Aani Loksanskruti
- Availability: In Stock
-
₹300/-
- Ex Tax: ₹300/-
भारतीय समाजव्यवस्थेत पारधी समाजाचे अस्तित्व
अनादि कालापासून आहे,
त्यासंबंधीच्या अनेक कथा, मिथके, संदर्भ
पुराणकाळापासून उपलब्ध आहेत.
गावरहाटीपासून अलिप्त राहणार्या ह्या समाजाची
स्वतःची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.
त्यांचे लोकजीवन, लोकसंस्कृती, भाषा, सण-उत्सव, धार्मिक रूढी व
परंपरा, दैवते ह्यांविषयी माहिती प्रस्तुत पुस्तकात आहे.
पारधी समाजाची बोलीभाषा व त्यांची सांकेतिक भाषा,
समाजाचे जातवास्तव आणि जातपंचायत,
गावोगावी होणारे स्थित्यंतर ह्याची एकत्रित माहिती
ह्या ग्रंथात दिली आहे.
एकूणच पारधी समाजाचा सर्वांगीण अभ्यास करून
सिद्ध केलेला हा ग्रंथ मानवसमूहाच्या व समाजशास्त्राच्या
अभ्यासकांना उपयुक्त ठरेल.
एका उपेक्षित समाजाचे अंतरंग उलगडून दाखविणारा हा ग्रंथ
संग्राह्य आहे.