• Yukrandche Diwas | युक्रांदचे दिवस

Yukrandche Diwas | युक्रांदचे दिवस

  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-

स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींचा इतिहास ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) ह्या संघटनेला टाळून लिहिता येणार नाही. धर्मनिरपेक्ष समाजवाद, लोकशाही, मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेसाठी युक्रांदने दिलेले लढे आणि चळवळी आजही अनेकांच्या लक्षात असतील.

ह्या चळवळीत विजय दर्प सहभागी झाले. चळवळीतील आपल्या अनुभवांवर व निरीक्षणांवर त्यांनी हे पुस्तक लिहिले असले तरी ते त्यांचे आत्मचरित्र नाही, तसेच युक्रांदचा पूर्ण इतिहासही नाही. युक्रांदने आपणास कसे आकर्षित केले, युक्रांदचा पूर्ण वेळ कार्यकर्ता कसे बनलो, आपण ह्या चळवळींचा व विचारांचा भाग कसे बनलो यासंबंधीचे हे प्रांजळ निवेदन आहे. विविध कार्यकर्त्यांशी व नेत्यांशी झालेला स्नेह, विविध चळवळींतून घडलेले समाजदर्शन, भ्रष्ट अशा शासकीय किंवा प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध बंड करण्याची वृत्ती व त्यातून घडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व येथे समजून घेता येते.

एका निरपेक्ष व प्रामाणिक कार्यकर्त्याचे हे निवेदन म्हणजे एक सामाजिक दस्तऐवज आहे. अन्यायाविरूद्ध उभे राहण्यासाठी यातून आजच्या नवयुवकांना बळ मिळाले, प्रेरणा मिळाली तर पुस्तकाचा हा उद्देश सङ्गल झाला असे म्हणता येईल.

Write a review

Please login or register to review