Swamagna (Autistic) Mule Ani Apan Sagle |स्वमग्न (ऑटिस्टिक) मुले आणि आपण सगळे

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-

ऑटिस्टिक मुलांच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या अनुभवी तज्ज्ञांचे कानमंत्र देणारं हे पुस्तक ऑटिस्टिक मुलांबरोबर काम करणार्‍यांच्या आशा प?वीत करतं आणि ऑटिझमबद्दलची त्यांची आंतरदृष्टी अधिक सखोल बनवतं. ऑटिस्टिक मुलांच्या भोवती आवश्यक असणार्‍या समाजात पालक, शिक्षक, मित्र, बालरोग तज्ज्ञ व वेगवेगळे तज्ज्ञ यांचा समावेश असतो. एकमेकांकडून शिकत, एकमेकांना आधार देत ही मंडळी ऑटिस्टिक मुलांना कशी मदत करतात याचं मनोज्ञ चित्रण ह्या पुस्तकात आढळतं. या मंडळींचे वेगवेगळे गट आपापल्या नजरेतून ऑटिस्टिक मुलांकडे पाहतात; पण त्या नजरांमध्ये दोन गोष्टी सामाईक असलेल्या जाणवतात, त्या म्हणजे जीवनाबद्दलचा नितांत आदर आणि ऑटिस्टिक मुलांना मदत करण्याची अनिवार ऊर्मी. या पुस्तकातील पात्रं काल्पनिक आहेत, पण त्यांच्याकडून मिळणारी माहिती लेखिकेच्या या क्षेत्रातल्या प्रदीर्घ अनुभवावर आधारलेली आहे. ऑटिस्टिक मुलांसाठी आणि असेच प्रश्न असणार्‍या इतर मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, विकसित करण्याचे कार्य गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ लेखिकेने केलं आहे. ङङ्गऑटिस्टिक मुलं आणि आपण सगळे' हे पुस्तक ऑटिझमवरच्या कार्यशाळेला संदर्भ पुरविण्यासाठी तसेच मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या विषयांच्या प्रारंभिक अभ्यासक्रमासाठी उपयु?त ठरू शकेल.

Write a review

Please login or register to review