Daivadnyashreesuryakavivirachitam Ramkrishnavilomakavyam | दैवज्ञश्रीसूर्यकविविरचितम् रामकृष्णविलोमकाव्यम्
- Author: Dr. Vasudev Maruti Auti | संपा. डॉ. वासुदेव मारुती औटी
- Product Code: दैवज्ञश्रीसूर्यकविविरचितम् रामकृष्णविलोमकाव्यम्
- Availability: In Stock
-
₹80/-
- Ex Tax: ₹80/-
रामकृष्णविलोम काव्याच्या 36 श्लोकातील पहिल्या चरणातील अक्षरे उलटक्रमाने वाचल्यास चौथा चरण मिळतो आणि दुसर्या चरणातील अक्षरे उलट्या क्रमाने वाचल्यास तिसरा चरण मिळतो. अशा उलट-सुलट रचनेमुळे या काव्याला ‘विलोमकाव्य’ म्हणतात.
अशा प्रकारची काव्यरचना करणे हे सामान्यांच्या बुद्धिसामर्थ्यापलिकडे आहे. यामध्ये श्रीरामकथा आणि श्रीकृष्णकथा यातील काही प्रसंगांचे वर्णन आहे.
पहिल्या आणि दुसर्या चरणात श्रीरामकथा सांगताना अशी अक्षरयोजना करावयाची की ती तिसर्या व चौथ्या चरणांत अक्षरे उलटक्रमाने घेऊन श्रीकृष्णकथा सिद्ध होईल! ते सुद्धा छन्दयोजना अबाधित राहून! खरोखर हे सर्व कल्पनेपलीकडचे आहे! हे केवळ सरस्वतीचा पुत्रच करू शकतो!