Kishorana Samjun Ghetana |किशोरांना समजून घेताना

  • ₹210/-

  • Ex Tax: ₹210/-

इयत्ता पाचवी ते दहावी ह्या शालेय गटातील मुला-मुलींचे वय व त्यांच्या वाढीचा हा टप्पा महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील ही वर्षे फार महत्त्वाची असतात. ह्या वयातील मुलं-मुली फारशी मोठी नसतात आणि लहानही, मधलीच एक गोंधळलेली अवस्था असते. आजूबाजूचं वातावरण व वयामुळे ह्या मुलांत होणारे शारीरिक बदल, मानसिक आंदोलने वेगवेगळी असतात. अशा नाजूक काळात प्रत्येक मूल समजून घेऊन त्याच्याशी वागणं ही अवघड कला ठरते. ह्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या पौगंडावस्थेतील समस्या ह्या महत्त्वाच्या विषयावर नलिनी जुगारे ह्यांनी अभ्यास केला. ह्या समस्यांमुळे निर्माण होणारी कोंडी त्यांनी आपल्या निरीक्षणातून, संशोधनातून व अभ्यासातून स्पष्ट व मुक्त केली आहे. काही मार्गदर्शन केले आहे व आदर्श शिक्षिकेप्रमाणेच समुपदेशकाची भूमिकाही घेतली आहे. प्रयोगशील अध्यापिका असलेल्या नलिनी जुगारे यांचे हे पुस्तक पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शक ठरेल. आपल्या निरागस व निष्पाप मुलांचे व विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य सुवर्णमय व्हावे ह्या उदात्त हेतूने त्यांनी हे पुस्तक साकारले आहे.

Write a review

Please login or register to review