Sandhiwat | संधिवात

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-

मराठी भाषेत संधिवाताविषयी अनुभवसंपन्न वैज्ञानिक माहिती देणारे हे पहिलेच पुस्तक. डॉ. श्रीकांत वाघ (र्‍हुमॅटॉलॉजिस्ट) यांनी लिहिलेल्या संधिवाताविषयक विविध लेखांचे येथे संकलन आहे. संधिवात हा एकच आजार नाही. शंभरेक आजारात ते एक लक्षण असते. संधिवाताच्या वेगवेगळ्या प्रकारांचे तसेच त्यातून उद्भवणार्‍या उपद्रवांचे व्यापक स्वरूप या लेखांमधून पदोपदी जाणवते. लवकर झालेले योग्य निदान आणि अचूक उपचारांमुळे सांध्यांचा नाश टळून संधिवाताच्या रुग्णांचे जीवन बदलू शकते. नवनव्या औषधांमुळे संधिवाताच्या उपचारांमध्ये क्रांती झाली आहे. संधिवाताचे चांगले नियंत्रण करणेही आता शक्य आहे. संधिवाताविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यास आणि रुग्णांसाठी पुरेशी माहिती देण्यास या पुस्तकामुळे खात्रीने हातभार लागेल.

Write a review

Please login or register to review