• Paragandha | परागंदा

Paragandha | परागंदा

  • ₹240/-

  • Ex Tax: ₹240/-

डॉ. श्रीधर  व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू  आहे ; मानदंडही  आहे. 
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या  तेहतीस खंडांनी  ज्ञानसागराचे  मंथन  करून  महाराष्ट्राच्या  करतालावर अमृताचा नैवेद्य  ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने  मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या  वेटोळे  घालून  बसलेल्या मराठी  कादंबरीला घनदाट अरण्याचे  रूप  दिले. 
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे  शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी  मोहित  केले 
-

परागंदा
या कादंबरीला जोडमथळा आहे,
"भारतीय समाजाची  सरहद्द " हा १९२६ साली प्रकाशित झालेली ही  कादंबरी आजही मराठी वाचकाला अंतर्मुख करणारी चर्चाप्रधान कादंबरी आहे; कारण तिचा विषय आहे अमेरिकेत स्तलांतरित झालेली  भारतीय. केतकरी कादंबरीतील सर्व सीमा-सामर्थ्य या कादंबरीत प्रातिनीधिक स्वरूपात अवतीर्ण  झाले आहे. 
डॉ. मत्तमयूरीच्या रूपाने लेखकाने येथे वेश्यासंततीचा प्रश्नही हाताळला  आहे ;
अशी ही आपल्या समाजाची आणि कादंबरीकाराची सरहद्द अधोरेखित  करणारी कादंबरी. 

- डॉ. द. भि. कुलकर्णी  

Write a review

Please login or register to review

Tags: Paragandha | परागंदा