Aashawadi | आशावादी
- Author: S. V. Ketkar |श्री. व्यं. केतकर
- Product Code: Aashawadi | आशावादी
- Availability: In Stock
-
₹350/-
- Ex Tax: ₹350/-
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;
त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले.
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले
-
आशावादी
कादंबरीस जोडमथळा देणे हे केतकरांचे एक खास वैशिष्ट्य :
त्यातून कादंबरीकार एकाच वेळी काव्यात्मता व वास्तवात यांचे संसूचन करतो : जसे,
'आशावादी अथवा एका प्रवाहपतिताचे चरित्र '
ही १९२७ ची कादंबरी.
ह्या कादंबरीतील "प्रवाहपतित" आहे ब्रह्मगिरीस्वामी.
ह्या स्वामीच्या रूपाने कादंबरी राजकारण, समाजकारण, धर्मकारण यांचा विशाल पट साकार करते.
कुसुमावती देशपांडे यांच्यासारख्या चोखंदळ समीक्षिकेने या कादंबरीचा गौरव केला आहे , एवढे सांगितले म्हणजे पुरे !
- डॉ. द. भि. कुलकर्णी
Tags: Aashawadi | आशावादी