Aaltoon Paaltoon | आलटून पालटून

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-

व्यंगचित्रे ही मधुकर धर्मापुरीकरांच्या जगण्याचा भाग झालेली आहेत. कुटुंबीय, ऑङ्गिसमधले सहकारी यांच्याबरोबर रोजच्या जीवनातील सुख-दु:खे अनुभवताना धर्मापुरीकरांना एखादं व्यंगचित्र आठवतं आणि

परीसस्पर्श व्हावा तसं त्या अनुभवाचं रुपांतर आस्वाद्य अशा ललित लेखात होतं. अशा ललित लेखांचा हा संग्रह आहे. धर्मापुरीकर कथालेखक आहेत आणि चित्रांचे आस्वादकही आहेत. वसंत सरवटे यांच्यासारख्या व्यंगचित्रकाराच्या सहवासात राहून आणि भारतीय आणि परकीय व्यंगचित्रांच्या सततच्या परीशीलनातून धर्मापुरीकरांची एक दृष्टी तयार झालेली आहे. ती व्यंगचित्रातला आशय शोधत असतानाच व्यंगचित्रांमधली तांत्रिक कौशल्य, चित्रकलेच्या रेषा किंवा अवकाश यासारख्या मूलभूत घटकांचा वापर याबद्दलही मार्मिक भाष्य करते.

व्यंगचित्रांसारख्या कलाकृतीच्या आस्वादामध्ये येणारे कृतार्थतेचे अनेक तरल आणि निसटते क्षण धर्मापुरीकर यांनी ललितबंधाच्या रुपाने नेमके पकडले आहेतवाचकांच्या दृष्यजाणिवा त्यामुळे नक्कीच अधिक समृध्द होतील.

दीपक घारे

Write a review

Please login or register to review

Tags: Aaltoon Paaltoon | आलटून पालटून