Maharashtriyache Kavyaparikshane | महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-

मराठी साहित्यनिर्मितीच्या प्रारंभकाळापासून ते पेशवाईच्या अखेरीपर्यंत निर्माण झालेल्या मराठी वाङ्‌मयाकडे पाहण्याचा एक अभिनव दृष्टिकोन डॉ. केतकरांनी येथे प्रकट केला आहे. महाराष्ट्रीय कवींनी (आणि वाचकांनी) जे काव्यपरीक्षण केलेत्याचे आणि त्यांतून त्यांची जी वाङ्‌मयाभिरुची प्रकट झालीतिचे ऐतिहासिक विवेचन डॉ. केतकरांनी या ग्रंथामध्ये केले आहे. मराठी कवींची काव्यनिर्मितीमागील भूमिका, प्रेरणाप्रयोजन हे संस्कृत काव्यनिर्मितीमागील भूमिका, प्रेरणाप्रयोजन यांच्यापेक्षा कसे भिन्न होते ते येथे स्पष्ट होते. डॉ. केतकर म्हणजे माहितीचा ज्ञानकोश’. वाचकांच्या रूढ समजुतींना धक्के देऊन त्यांना स्वतंत्र विचार करायला लावणे हे डॉ. केतकरांचे वैशिष्ट्य याही ग्रंथात दिसते.प्राचीन मराठी वाङ्‌मयाच्या अभ्यासाच्या ज्या अनेक दिशा या ग्रंथात डॉ. केतकरांनी दाखविल्या आहेत, त्या आजही मार्गदर्शक आहेत.


Write a review

Please login or register to review