Aadhunik Hindi Sahitya : Antaranga |आधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग

  • ₹480/-

  • Ex Tax: ₹480/-

डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे द्वैभाषिक लेखक-समीक्षक आहेत. त्यामुळे मराठी व हिंदी ह्या दोन्ही भाषांतील साहित्याचा तौलनिक अभ्यास हा त्यांचा चिंतनाचा व लेखनाचा विषय राहिला आहे.
प्रस्तुत ग्रंथात हिंदी-मराठीचे अंतःसंबंध प्रकट करतानाच दोन्ही भाषांतील काही साहित्य-कलाकृतीविषयी तुलनात्मक विचारही डॉ. बांदिवडेकर यांनी मांडले आहेत.
हिंदीतील काही मुख्य साहित्यप्रकारांची त्यांनी सखोल चर्चा केली आहे. त्यांचा मुख्य हेतू हिंदी साहित्याचे दर्शन घडवणे हा आहे.
त्याबरोबरच या ग्रंथातून आधुनिक हिंदी साहित्याचे अंतरंग जाणून घेता येते आणि हिंदीच्या आधुनिक हिंदी साहित्याचे एक परिदृश्य निश्चित स्वरुपात उभे राहते. तसेच आधुनिक हिंदी साहित्याच्या स्वरूपाचा, शक्तीचा आणि मर्यादा-वैशिष्ठ्यांचा बोध होतो.
आधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग ह्या ग्रंथात ज्या साहित्याकारांची व त्यांच्या कलाकृतींची चर्चा केली आणे, ते सर्वच साहित्यकार आणि त्या कलाकृती हिंदी सर्वश्रेठ मानल्या जातात.
त्यांचे श्रेष्ठपण डॉ. बांदिवडेकर यांनी अतिशय सहृदय वृत्तीने दाखवून दिले आहे.
हिंदी साहित्याचे दरवाजे खुले करणारा हा मौलिक ग्रंथ मराठी-हिंदी ह्या दोन्ही भाषांच्या अभ्यासकांना व मर्मज्ञ वाचक-रसिकांना मार्गदर्शक ठरेल. .  

Write a review

Please login or register to review