Ranavanache Moods |रानावनाचे मूड्स

  • ₹320/-

  • Ex Tax: ₹320/-

रानबोड्या , रानशेती , रानवाटा या निसर्गाच्या विविध अंगांवर विविध ऋतूंमधील रानावनाच्या मूड्सच्या  उमटलेल्या विविध छटा व या सगळ्यांशी जोडले गेलेले  मानवी  जीवन या पुस्तकाच्या पुर्वार्थात   आपल्यला  वाचायला  मिळेल.मानवाची जीवनशैली,त्याच्या   हातून कळत नकळत झलेल्या चुका,लोकसंख्याची वाढ यांतून रानावनाच्या या विविध  नाजूक अंगांना छेडलं गेलं. त्यातून निसर्गाला असंख्य व्याधी  जडल्या. माणूस निसर्गाचाच  एक भाग  असताना तो मग यातून कसा  सुटेल ?  

पुस्तकाच्या उत्तरार्धात मानव-वन्यजीवन संघर्ष कसा उभा राहिला व त्यातून दोघेही कसे भरडले जात आहेत, ते भयावह चित्र वाचकांची झोप उडविणारे ठरले. मानव व वन्यप्राणी यांच सहजीवन शक्य नाही काय? त्यासाठी काही हिरव्या शिलेदारांची आदर्श वाचकांसमोर ठेवलेत.

हे पुस्तक केवळ साहित्यकृती म्हणून पाहू नये. वैचारिक हिरव्या आंदोलनाचे ते दिशादर्शक व्हावे. आपले असंख्य हात या निसर्गाचे बिघडू पाहणारे मूड सांभाळण्यासाठी ठराविक दिशेने व विशिष्ट वेगाने पुढे सरसावे. हाही उद्देश पुस्तक बांधताना डोळ्यासमोर होता.Write a review

Please login or register to review