Sangeet Sharada: Ek Vangmayin Ghatana| संगीत शारदा : एक वाङ्‌मयीन घटना

  • ₹150/-

  • Ex Tax: ₹150/-

गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदाया नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ रोजी इंदूर येथे झाला. ह्या गोष्टीला आता एकशे दहा वर्षे पूर्ण झाली. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे संगीत शारदाया नाटकाचा सुमारे एकशे दहा वर्षांतील टीकेचा समग्र अभ्यास आहे. देवलांनी संगीत शारदाहे नाटक का लिहिले? समीक्षकांनी त्या संबंधी वेळोवेळी काय म्हटले, याचा समग्र अभ्यास हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. संगीत शारदाया नाटकावर सर्वाधिक आणि सातत्याने समीक्षा होत असल्याने ही मूल्यगर्भ कलाकृतीआहे असे डॉ. अंजली जोशी म्हणतात. या सर्व अभ्यासाचा, मत-मतांतराचा सापेक्ष परामर्श अत्यंत सुबोध रीतीने, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता मुद्देसूद पद्धतीने, नेमकेपणाने या ग्रंथात आलेला आहे. हे सर्व लेखन सखोल विचार आणि चिकित्सक दृष्टीने केलेले असल्याने वाचनीय झाले आहे. या सर्व अभ्यासाचा निष्कर्ष म्हणजे संगीत शारदाहे १८९९ सालचे नाटक, ‘एक वाङ्‌मयीन घटनाआहे, हा आहे.

Write a review

Please login or register to review