• Mavltya Gavache Gane |मावळत्या गावाचे गाणे

Mavltya Gavache Gane |मावळत्या गावाचे गाणे

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-

मानवी जाणीव-नेणिवेचे
उत्खनन होत आहे...
एकीकडे वर्षानुवर्षे चालत आलेल्या
रूढी-परंपरा-संस्कृती, समाजभावना,
त्यातील नाती-मूल्ये...
तर दुसरीकडे, जागतिकीकरणाच्या ओघात
आलेले स्वतंत्र व्यक्तित्व,
पुरोगामी आणि सामाजिक-आर्थिक उलथापालथ
अशा दोन नद्यांच्या संगमावर
अगदी मधोमध, कवी उभा आहे...
त्यांच्या अभिसरणाचे संघर्ष-तुषार
त्याच्या गालावर उडत आहेत...

दूरवर धूसर पसरलेले
अन् मिनिटा-मिनिटाला वाढत जाणारे,
हे शहर -
झोपडपट्ट्यांमध्ये आपली मुळे घट्ट रोवून
उभ्या असलेल्या गगनचुंबी इमारती-बाजारपेठा
त्यांच्यावर लुकलुकणारे लाल दिवे
या सर्वांचे पुसट प्रतिबिंब
त्याच्या डोळ्यांत उमटत आहे....

कवी फक्त उभा आहे...
तो आहे फक्त साक्षी
अन् त्याच्या हृदयाच्या चुकणार्‍या
प्रत्येक ठोक्याचे हे,
‘मावळत्या गावाचे गाणे’

- पुनर्वसू

Write a review

Please login or register to review

Tags: Mavltya Gavache Gane |मावळत्या गावाचे गाणे