Tantotant । तंतोतंत

  • ₹150/-

  • Ex Tax: ₹150/-

आपल्यापुढे वाढून ठेवलेल्या या वर्तमानाची प्रकृती नीट नाही.
अगणित कोलाहलांनी थैमान घातले आहे.
जणू श्वासांवरच रचले जाऊ लागले आहेत दगड.
भवतालातली तगमग रस्त्यांप्रमाणे दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे.
परिचितांचेही चेहरे अनोळखी वाटावेत,
इतपत संभ्रमाचे साम्राज्य आजूबाजूला घनदाट होत चालले आहे.
अशा व्यापक परंतु, आतल्या आवाजांचा हात हातांत घेऊन
ही कविता वाचकांच्या स्वाधीन होत जाते.
मुळात केशव सखाराम देशमुख यांची सर्जनशीलता ही
 वस्तुस्थिती आणि मन:स्थिती यांच्यात साकव बांधते.
नेमके हेच या कवितेचे बलस्थान आहे.
म्हणूनच या कवितांचा पायघोळ परिसर प्रत्येकाला आपला वाटत राहतो.

Write a review

Please login or register to review

Tags: Tantotant । तंतोतंत