• Aamhi Ghaamache Dhani | आम्ही घामाचे धनी

Aamhi Ghaamache Dhani | आम्ही घामाचे धनी

  • ₹150/-

  • Ex Tax: ₹150/-

  

मराठी काव्यजगतामध्ये स्वतःची स्वतंत्र अशी नाममुद्रा उमटविणारे कवी म्हणून उद्धव कानडे ओळखले जातात . त्यांच्या कवितेने नेहमीच श्रमाचे मोल आणि घामाचा अर्थ सांगितला आहे .

या संग्रहात तर त्यांची कविता वेदनांचा मोहोळ होऊनच येते . हे मोहोळ वाचकांना दंश तर करतेच , पण अंतर्मुख करते . व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागते . 

ज्या श्रमिकांच्या श्रमावर जग उभे राहते , त्या श्रमिकांनाच पायदळी का तुडवले जाते हा तो कळीचा प्रश्न होय . या प्रश्नाच्या शोधातून मग वेदनांचा गाव साकार होत जातो . या गावाच्या केंद्रस्थानी आहे आई आणि आईचेच दुसरे रूप असणारी भूमी .

आईचे श्रम , वेदना अन अजिंक्य आत्मविश्वास ठायीठायी व्यक्त होत जातो . 

भूमीचे उदारपण आणि आज जागतिकीकरणामध्ये तिला आलेली अवकळाही व्यक्त होत जाते . हे सारे साकार करणारी त्यांची  एकएक कविता मग घामाचे एकएक सुक्त बनत जाते .

ही सारी सुफ्ते जीवनाच्या पुन पुनर्मांडणीचे भान देऊन जातात . त्यांची एकएक कविता व्यवस्थेवर केलेला वारच असतो . हा वार अधिक धारधार होतो , तो तिच्यातील अतंर्गत लयीमुळे . त्यामुळेच ती गेय आणि कमालीची उत्कट होत जाते .  

 


Write a review

Please login or register to review