Ek Dukh Manat Laplela | एक दु:ख मनात लपलेलं

  • ₹70/-

  • Ex Tax: ₹70/-

केवळ हौस म्हणून वा उत्साह म्हणून शब्दांशी खेळणारे जे नवोदित कवी

आज आपणास दिसतात; त्यापेक्षा श्री. प्रशांत वेळापुरे यांची कविता सर्वस्वी वेगळी आहे. जीवनाविषयी स्वत:चे काही वेगळे सांगू पाहणारे आणि काव्यनिर्मितीकडे गांभीर्याने पाहणारे ते एक कवी आहेत. एका तपाहून अधिक काळ ते कवितेची मन:पूर्वक साधना करीत आले असून जीवनाला लालित्य आणि लालिभा प्राप्त करून देणार्‍या विशुद्ध प्रीतीच्या आविष्कारापासून तो अवती-भवतीच्या समाजातील शोषितांच्या दु:खापर्यंत त्यांची काव्यप्रतिभा संचार करणारी आहे. दु:ख हा त्यांच्या कवितांचा स्थायीभाव असला तरी या दु:खाला अनेक पदर लाभले आहेत. अनेक सूर लाभले आहेत. भूक शमविण्यासाठी स्वत:चा देह अंथरणार्‍या माऊलीच्या दु:खापासून तो मुखवटे धारण करणार्‍या प्रतिष्ठित  बदमाशाकडून फसविल्या गेलेल्या सामान्य माणसापर्यंतचे दु:ख येथे प्रकट झाले आहे. आणि तेही काव्यात्म स्वरूपात सहज नि स्वाभाविक शब्दकलेतून नि कवितेवरील अभंग निष्ठेतून जन्मलेल्या वृत्तीतून.

- द. ता. भोसले

Write a review

Please login or register to review