Garbhavaibhavi | गर्भवैभवी
- Author: Tirtharaj Kapgate | तीर्थराज कापगते
- Product Code: Garbhavaibhavi | गर्भवैभवी
- Availability: In Stock
-
₹160/-
- Ex Tax: ₹160/-
तीर्थराज,
प्रिय,
तुमच्या कवितेचे हस्तलिखित प्रेमाने चाळले. त्यातील कवितांना स्पर्श केला; आणि थबकलो. या कवितांमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमची सगळी आतली इंद्रिये
दिसतात. स्वत:ची ओंजळ बरोबर घेऊन, वेगळ्या पद्धतीचे आयुष्य तुम्ही
जगताहात. त्याला घरातील छोट्या युनिटचा आधार आहे. त्या जगण्यातला दंडक, तुमच्या आयुष्यातील एक कसोटी, म्हणून लोक या कवितेकडे
बोट दाखवतील. तुमच्या जगण्याची सहिष्णु पद्धत आणि तुमच्या कुटुंबनिष्ठेप्रमाणेच तुमच्या
उशापायथ्याशी रेंगाळणारी ही कविता म्हणजे तुम्हाला फुटलेला एक अवयव आहे. मोठी परीक्षा
देऊन पास झाल्याचा हा दाखला हरवू नका. त्याची नीट गुंडाळी करून, त्याला रबरबँड लावून, त्याला छातीशी कवटाळून धरा. तुमच्याच
टोपीवर खोचलेले तुमच्या मालकीचे हे मोरपीस फार मोलाचे आहे. ही कोण्या दानशूराने दिलेली
देणगी नाही. सृजनाच्या या सुंदर पिसार्यात समाजशास्त्रीय सूक्ष्मता आहे; आणि तरीही त्यात सृजनार्थ कुरघोडी नाही. कलावंताच्या प्रभावी हुंद.यातून निसर्गाच्या
उद्गाराचे हुंकार बाहेर पडतात. निसर्गसत्तेचे ते उद्गार निरपवाद असतात. ‘गर्भवैभवी’ नावही फार सुरेख आहे.
Embryo
position, ज्यात
कुठलाच ऋतू फार मानवत नाही.
May God stand along with you and
If you allow me to stand with you.
देवाने तुम्हाला काहीतरी अधिकचे दिले आहे; त्याला आपल्या
आत्म्याच्या हुंकारात परिवर्तित करीत रहा.