Uttam Anuwad 2022 | उत्तम अनुवाद २०२२

  • ₹320/-

  • Ex Tax: ₹320/-

स्मृती-विस्मृती विशेषांक

‘स्मृती आणि विस्मृती’ हे माणसाला मिळालेली दैवी देणगीच आहे. दैनंदिन जीवनात अनेक व्यक्ती, वस्तू, घटना, ठिकाण यांचा प्रभाव पडत असतो. एखादा दिवस असा असतो, जो आयुष्याला मोठी कलाटणी देऊन जातो. काही साध्या सवयी इतक्या अंगवळणी पडतात की, त्या संस्कृतीचादेखील
भाग होतात.
मात्र काळाच्या ओघात काही गोष्टी मागे पडतात, त्या विस्मृतीत जातात आणि त्यांचा प्रभाव कमी होतो.
असे असले तरी, विस्मरणात गेलेल्या या व्यक्ती, वस्तू, दिवस, ठिकाण, घटना यांविषयीच्या आठवणी पुन्हा मनामध्ये तरळू लागतात, तेव्हा त्या अनेक संवेदना, अनेक भावनांना उद्युक्त करतात.
या आठवणी बालपणाविषयी, सहलीला गेलेले ठिकाण व तिथले अनुभव, आवडते गाणे अशा वैयक्तिक असू शकतात किंवा बैलगाडी, टेलिग्रामसारख्या सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पडलेला आहे, अशा असू शकतात. ‘स्मृती आणि विस्मृती’ यांच्या क्षितिजावरचा हा खेळ आपल्यापैकी अनेकांना भुलवत राहतो.
जगातील श्रेष्ठ कलाकृतींचे हे अनुवाद समर्थ अनुवादकांनी केले आहेत.

कथा
अ‍ॅलीस मन्रो, रवींद्रनाथ टागोर, ओर्‍हान पामुक, आशापूर्णादेवी, महाश्वेतादेवी,
मस्ती व्यंकटेश अय्यंगार, मोहन राकेश, मनोज दास, धूमकेतु, असगर वजाहत, रे ब्राडबेरी,
योहान पेटर हेबेल, प्रदीप रायगुप्त, अख्तर मोईउद्दीन, पोंकुन्नम वारकी, ललित मिश्रा,
आयन क्रायटन स्मिथ, इस्मत चुगताई, नील गेमन, मार्सेल  प्रूस्त ,
युजीनिया डब्ल्यू कोलियर, वॅसिनी लारेज्

लेख
पापुस्झा, सद्गुरू

कविता
अनिरुद्ध सिंह सेंगर

Write a review

Please login or register to review

Tags: Uttam Anuwad 2022 | उत्तम अनुवाद २०२२