Ahirani Vatta | अहिराणी वट्टा

  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-


अहिराणी वट्टाहे अहिराणी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. अहिराणी ओट्यावर रंगणार्‍या एकत्र गप्पा, चर्चा म्हणजे अहिराणी वट्टा. वट्ट्यावरील ह्या बावन्न लेखांतून अहिराणी भाषा, अहिराणी लोकजीवन आणि लोकसंस्कृती यांचे दर्शन घडले आहे. डॉ. सुधीर देवरे हे अहिराणी भाषेचे अभ्यासक आहेत. अहिराणी भाषा व लोकपरंपरांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. ह्या लेखसंग्रहामुळे अहिराणी भाषेतील व लोकजीवनातील काही अलक्षित राहिलेल्या गोष्टी समजून घ्यायला हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही. बोलीभाषा, लोकसाहित्य आणि आदिवासी साहित्याच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. शिवाय महाराष्ट्रातील ह्या महत्त्वाच्या भाषेत ह्या पुस्तकामुळे मौलिक भर पडली आहे.

Write a review

Please login or register to review