Majhya Jagat Mi |माझ्या जगात मी

  • ₹115/-

  • Ex Tax: ₹115/-


...आठवणी, आठवणी म्हणजे किती? घराच्या... नात्यागोत्यातल्या... विविध क्षेत्रांतल्या... सहकार्‍यांच्या... परदेशात सहवासात आलेल्या भल्या भल्या व्यक्तींच्या... आठवणींच्या जत्रेत आपण स्वत:ला हरवून बसतो.

अनेक प्रसंगांनी अचंबित होतो. आठवणी मध्येच कधी तरी हसतखेळत

आपल्याला खूप काही शिकवतात; विचार करायला लावतात.

या सर्व आठवणींचं कथन आंतरिक ओढीतून झालेलं आहे. त्यावर

आत्मप्रौढीचा टिपूसही नाही; पण आपुलकीचा, माणुसकीचा त्यावर

शिडकावा आहे. कुठंही कटुता नाही, ती समंजसपणे टाळलेली आहे. संस्कारक्षम मनाचंच ते द्योतक आहे. घेणार्‍याला या आठवणींतून संस्कार, समाधान, तृप्ती आणि जीवन सार्थकी लावण्याची दिशा नक्कीच मिळेल.

- शं. ना. नवरे

Write a review

Please login or register to review