Aankhi Ek Paul | आणखी, एक पाऊल

  • Product Code: Aankhi Ek Paul | आणखी, एक पाऊल
  • Availability: In Stock
  • ₹260/-

  • Ex Tax: ₹260/-


प्रशासकीय सेवा ही एका अर्थाने जनसेवा करण्याची मोठी संधी असते. अधिकारपदाच्या माध्यमातून जनहिताची मोठी कामे करता येतात, याची प्रचीती हे आत्मचरित्र वाचताना येते. चेहरा नसलेल्या एका कुटुंबातून इ. झेड. खोब्रागडे संघर्ष करत पुढे आले. प्रशासकीय सेवेत रुजू झाले, संविधानामुळे प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर त्यांनी समाजहितासाठी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. समाजातील शोषित, वंचित, उपेक्षित, साधनहीन, अभावग्रस्त मागासवर्गाच्या कल्याणासाठी व विकासासाठी निष्ठेने व सचोटीने काम करणे म्हणजे समाजसेवा. ही समाजसेवा त्यांनी व्रतस्थ वृत्तीने, प्रामाणिकपणे, संपूर्ण प्रशासकीय कारकिर्दीत केली. हे तटस्थ वृत्तीने केलेले प्रामाणिक आत्मकथन आहे. हे वाचून कोणी प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍याने प्रेरणा घेतली आणि आपल्या सेवेचा, अधिकाराचा उपयोग समाजासाठी केला, तर ह्या आत्मचरित्र लेखनाचा हेतू सङ्गल झाला असे म्हणता येईल. मराठीत प्रशासकीय अधिकार्‍यांची आत्मचरित्रे फार अभावाने आली आहेत, ह्या पार्श्वभूमीवर ह्या आत्मचरित्राचे स्वागत जाणकार मराठी वाचक नक्की करतील, ही खात्री.

Write a review

Please login or register to review