Annapurna|अन्नपूर्णा
- Author: Dr. Aparna Jha |डॉ. अपर्णा झा
- Product Code: Annapurna|अन्नपूर्णा
- Availability: In Stock
-
₹170/-
- Ex Tax: ₹170/-
सुविख्यात संगीताचार्य अल्लाउद्दिन खॉं यांची कन्या आणि शिष्या,पं. रविशंकर यांची पहिली पत्नी अन्नपूर्णा यांचे जीवन म्हणजे स्वतःभोवती घालून घेतलेले लोहकठीण आवरणातील गूढ रहस्य आहे. संगीतप्रेमी आणि त्यांचे भक्त यांच्या मनात त्यासंबंधात अनेक प्रश्न आणि विलक्षण उत्सुकता आहे. विजनवास त्यांनी स्वेच्छेने स्वीकारला आहे, पण आजही त्या साधनेत मग्न आहेत. त्यांच्याहस्तस्पर्शाने प्राणवंत झालेले सूरवाद्य म्हणजे ‘सूरबहार’. त्या सूरबहारी ध्यानमग्न प्रतिमेसंबंधीचेच हे पुस्तक. ही प्रचलित अशी जीवनकहाणी नाही; तर एका कलाकाराच्या हरवलेल्या भूतकाळाचे आणि वर्तमानातील जीवनाचे पुनर्गठनच आहे. लेखकाने येथे अन्नपूर्णांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.