Khelimeli |खेळीमेळी

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-


प्रस्तुत खेळीमेळीही, म्हटले तर अभिनव पण खरे तर अपेक्षितच, अशी प्रा. रा. ग. जाधव यांची ओळख आहे. ललित आणि मननीय अशा उभयविध स्वरूपाचे हे बहुरंगी ललित गद्य आहे. वाऱ्यासवे इतस्तत: विखुरली जाणारी बीजे कधी कधी रुजतात व मग कुठे कुठे रंगीबेरंगी फुलांच्या रूपाने स्वत:च चकित होऊन डोलू लागतात, बोलू लागतात. खेळीमेळीम्हणजे या प्रकारचा अ-मोसमी फुलोरा आहे. मीमीचे अनुभव, लेखन, वाचन, चिंतन हेच या खेळीमेळीच्या प्रसन्न आत्माविष्काराचे आशय-विषय आहेत. या मीच्या अवकाशात गांभीर्य व लालित्य, मनस्वीपणा व मननीयता ही एकत्रच राहतात, एकत्रितच फुलतात. प्रा. जाधव यांच्यातील संवादोत्सुक पण चिंतनशील समीक्षक या

लेखनातही जाणवतो; पण इथे तो आहे खेळीमेळीच्या ललित मैफलीत! या मैफलीत रसिक वाचकांना मुक्त प्रवेश आहेच आहे...!

Write a review

Please login or register to review