Anandwani |आनंदवनी

  • ₹125/-

  • Ex Tax: ₹125/-

स्व. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेलं 'आनंदवन' हे भारताचं आधुनिक तीर्थक्षेत्रच झालेलं आहे. ते पाहण्यासाठी देशापरदेशातून असंख्य लोक तिथे येत असतात. मात्र नुसतं पाहण्यासाठीच नाही तर तिथे राहून आनंदवनातील कुष्ठरोगी आणि हेमलकसामधले आदिवासी रुग्ण यांची सेवा करण्यासाठी थेट अमेरिकेतून येणारी चंदा आठले एखादीच. अमेरिकेतल्या वैकीय क्षेत्राचा आणि रुग्णसेवेचा दीर्घ अनुभव गाठीशी घेऊन चंदा आठले इथे आल्या आणि इथल्या जीवनाशी पूर्ण समरस होऊन त्या रुग्णसेवेत गढून गेल्या. अमेरिकेत परतल्यावर भारावलेल्या मनःस्थितीतच एका विलक्षण ऊर्मीने त्यांनी आपला अनुभव लिहून काढला. त्यातून उभं राहिलेलं हे जिवंत चित्र म्हणजेच ङङ्गआनंदवनी'. डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचं हेमलकसामध्ये चालणारं लोकविलक्षण काम, गडचिरोलीतील डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचं ङङ्गशोधग्राम' आणि बाबा आमटे आणि साधनाताई तसंच डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारतीताई यांचं 'आनंदवन' ह्या सर्व ठिकाणी चालणार्‍या, माणुसकीवर आधारित रुग्णसेवेचं आणि विकासकार्याचं जवळून घडलेलं दर्शन चंदा आठले यांनी सहजस्फूर्त शैलीत इथे मांडलेलं आहे. त्यांच्या निर्मळ मनाचं प्रतिबिंबही त्यातून स्पष्टपणे उमटतं. वाचता वाचता आपणही चंदा आठले यांच्याबरोबर तिथे जाऊन पोहोचतो आणि त्यांच्यासारखेच भारावून जातो.

Write a review

Please login or register to review