Death In The Clouds | डेथ इन द क्लाउड्स
- Author: Madhukar Toradmal|मधुकर तोरडमल
- Product Code: Death In The Clouds | डेथ इन द क्लाउड्स
- Availability: In Stock
-
₹290/-
- Ex Tax: ₹290/-
त्याचे नऊ क्रमांकाचे आसन म्हणजे हर्क्युल पायरोला विमानातील आपल्या सहप्रवाशांचं निरीक्षण करण्यासाठी मिळालेली अगदी मोक्याची जागा होती.
त्याच्या उजव्या बाजूला एक देखणी तरुणी बसली होती आणि ती तिच्या समोरच्या माणसाकडे खूपच आकृष्ट झाल्याचे स्पष्ट दिसत होतं.
तेरा क्रमांकाच्या आसनावर होती एक कौंटेस जी आपलं कोकेनचं व्यसन लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी.
समोरच्याच आसन क्रमांक आठ वरच्या रहस्यकथा लेखकाला एक खोडकर माशी सारखा त्रास देत होती. अद्यापही पायरोला न जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याच्याच मागे आसन क्रमांक दोन वर असलेलं पूर्ण शिथिल पडलेलं एका स्त्रीचं प्रेत.
‘शेवटी आश्चर्याचा जबरदस्त धक्का ज्याला बसणार नाही, असा वाचक पराकोटीचा चाणाक्ष आणि विरळाच म्हणायला हवा.’
टाईम्स साहित्यविषयक पुरवणी