Taboo |टॅबू

  • ₹410/-

  • Ex Tax: ₹410/-

टॅबू ! वेश्यावस्तीतील अपरिचित जग. हे पुस्तक म्हणजे लाहोर येथील प्रसिद्ध शाही मोहल्ल्यातील वेश्यावस्तीची शोधयात्रा आहे. मोहल्ल्याशी निगडित लोक ? वेश्या, दलाल, संगीतकार, गिर्‍हाईक इत्यादी ? यांच्या आयुष्याची कहाणी, तसेच त्यांनी पाकिस्तानी कलेला दिलेलं योगदानही या कथांमध्ये लेखिकेनं अधोरेखित केलं आहे. वेश्याव्यवसायात 'चांगली माणसं' नसतात हा पाकिस्तानी लोकमनाचा भाव अनेक मिथकांमधून सांगितला गेला आहे. वेश्या 'सभ्य पुरुषांना' फसवून त्यांना वाईट कामं करायला भाग पाडतात; असा या मिथकांचा आशय आहे. ही मिथकं कितपत बरोबर आहेत याची शहानिशा करण्याचे प्रयत्न मात्र समाजाने कधी केले नाहीत. प्रस्तुत ग्रंथात लेखिका वेश्याव्यवसायासंबंधीच्या अशा मिथकांना चर्चास्थानी ठेवून, आपल्या समाजातील सर्व स्त्रिया अनुभवत असलेल्या सत्ताकारण व पुरुषसत्ताक पद्धतीसंबंधीच्या आपल्या आकलनातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करते.

Write a review

Please login or register to review