Stree Prashnanchi Charcha :Ekonisave Shatak| स्त्री प्रश्नांची चर्चा : एकोणिसावे शतक

  • ₹420/-

  • Ex Tax: ₹420/-

एकोणिसावे शतक हे विविध चळवळीच्या दुर्ष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे . स्त्रीप्रश्नासंबंधी बोलायचे झाले, तर आजच्या स्त्रीमुक्ती चळवळीची बीजे त्यातच सापडतात. प्रस्तुत ग्रंथात अशा संघर्षाची शोध घेतला आहे. 

प्रतिभा रानडे यांनी ' स्त्री प्रश्नांची चर्चा : एकोणिसावे शतक ' ह्या पुस्तकात स्त्री - शिक्षण , वैधव्य , बालविवाह , स्त्रीकडे पाहण्याचा  दुष्टीकोन अश्या गेल्या शतकातील स्त्री - जीवनाशी निगडीत प्रश्नांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न येथे केला आहे . गेल्या शतकातील महाराष्ट्रातील स्त्री - सुधारणेच्या इतिहासात ज्यांनी आपले काही स्थान निर्माण केले , अश्या व्यक्तीच्या विचारांचा परामर्श घेण्याचा प्रयत्नही लेखिकेने या ग्रंथात केला आहे.

हा प्रयत्न करताना स्त्रीवादी - भूमिकेतून प्रतिभा रानडे यांनी त्या काळाची काही वैशिष्टे टिपली आहेत . 

स्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणांचा शोध घेणारे हे पुस्तक म्हणून अतिशय महत्वाचे व संग्राह्य ठरणारे  आहे .

Write a review

Please login or register to review