Kanduri | कन्दुरी

  • ₹210/-

  • Ex Tax: ₹210/-

सतीश सुरवसे यांनी ‘कन्दुरी’ या कथासंग्रहातील एकूण सात कथांमधून वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. खरं तर व्यक्तिरेखाटन हा कथावस्तूतील अपरिहार्य असा घटक असतो, मात्र सुरवसे यांच्या कथेमध्ये तोच प्राधान्याने चित्रित होताना दिसतो. त्यामुळे सुरवसे यांच्या कथेतील नाट्यमयता आणि संघर्ष रसरशीतपणे अधिक उठावदार होतो.

ग्रामीण सामाजिक जीवनाचे पर्यावरण कथांमधून ठळकपणाने समोर येत असले, तरी रूढ अर्थाने ही ग्रामीण कथा नाही. मानवी स्वभावातील अतर्क्य कंगोरे, परिस्थितीच्या रेट्यामुळे निर्माण झालेली स्खलनशीलता, बदलत्या जीवनशैलीचा स्वीकार करताना परंपरेचा ताण सहन  करणारे समाजमन अशा अनेकविध आशयसूत्रांमुळे ही कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेते. 

बोलीभाषा, प्रादेशिकता, कृषिसंस्कृती, कुटुंबसंस्था अशा परिघाभोवती फिरणार्‍या ह्या कथा कोणत्याही साचेबद्ध पठडीत बसत नाहीत. मात्र माणसाचे मोल अधोरेखित करण्याची लेखकाची आंतरिक इच्छाही प्रकट केल्याशिवाय राहत नाहीत.
- डॉ. मनोहर जाधव

Write a review

Please login or register to review

Tags: Kanduri | कन्दुरी