• Lalitbandh |ललितबंध

Lalitbandh |ललितबंध

  • ₹550/-

  • Ex Tax: ₹550/-

हे ललित लेख अण्णांच्या लेखनाच्या अगदी प्रारंभकाळातली आहेत. अवघ्या विशी-बाविशीतले. तरी जाणत्या वाचकांना आनंद देणार्‍या गोष्टी या लेखनात पुष्कळ आहेत. अपरिचिताची सलोखी ओळख आहे, अज्ञाताचं भान आहे, रसास्वादांची समृद्धी आहे आणि जोडीने संस्कृतिसंचिताच्या बहुविधतेचं दर्शन आहे, विचक्षण बुद्धीचे उलगडे आहेत. निराळी दृष्टी देऊ पाहणारी नवताही आहे.

त्याखेरीज अण्णांचं प्रारंभकालीन वाचन, त्यांच्यावर झालेले अभिजात संस्कृत साहित्याचे संस्कार, दैवतविज्ञानाकडे वळू पाहणारी त्यांची उत्सुकता, महापुरुषासंबंधी आणि संस्कृतीच्या उभारणीतले महत्त्वाचे घटक म्हणून असलेल्या पावित्र्यव्यूहांसंबंधी त्यांना वाटणारी ओढ आणि त्यांच्या अभिरुचीचा आणि आकर्षणक्षेत्रांचा संभाव्य विस्तार यांचा अंदाजही या लेखनातून येऊ शकतो. 

लोकसंस्कृतीविषयीच्या त्यांच्या अभ्यासदृष्टीची घडण कशी झाली हे इथे ङ्गारसे स्पष्ट होत नसले तरी त्या प्रांताला उजळणार्‍या त्यांच्या मर्मदृष्टीची जाणीव या लेखनातून नक्कीच होते.

या ललितबंधांचा आस्वाद अशा अभिज्ञतेने घ्यायला हवा. 

Write a review

Please login or register to review