• Gondvanatil Priyavandha | गोंडवनातील प्रियवंदा

Gondvanatil Priyavandha | गोंडवनातील प्रियवंदा

  • ₹210/-

  • Ex Tax: ₹210/-


डॉ. श्रीधर  व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू  आहे ; मानदंडही  आहे. 
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या  तेहतीस खंडांनी  ज्ञानसागराचे  मंथन  करून  महाराष्ट्राच्या  करतालावर अमृताचा नैवेद्य  ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने  मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या  वेटोळे  घालून  बसलेल्या मराठी  कादंबरीला घनदाट अरण्याचे  रूप  दिले. 
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे  शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी  मोहित  केले 

-

गोंडवनातील प्रियवंदा 

ही  त्यांची १९२६ ची कादंबरी. समाजशास्त्रीय "घरकुट्टे घराण्याचा इतिहास" असा जोडमथळा असलेल्या या कादंबरीतील बिंबा  म्हणते , "राष्ट्र म्हणजे बायका, पुरुष नव्हे."
ही कादंबरीकाराचीच भूमिका ;
ती आजच्या समाजाने काळजात  आणि कपाटात जपली पाहिजे. 

- डॉ. द. भि. कुलकर्णी  

Write a review

Please login or register to review

Tags: Gondivanatil Priyavandha | गोंडवनातील प्रियवंदा