Bhatkya | भटक्या
- Author: S. V. Ketkar |श्री. व्यं. केतकर
- Product Code: Bhatkya | भटक्या
- Availability: In Stock
-
₹110/-
- Ex Tax: ₹110/-
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;
त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले.
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले
-
भटक्या
हरिभाऊंची आशयसीमा जिथे संपते, तिथून केतकरांची लेखनसीमा सुरु होते:
हे त्यांच्या समग्र कादंबरीविश्वाबाबत खरे आहे;
अगदी "भटक्या " (१९३८) या अपूर्ण कादंबरीबाबतही.
पात्रमुखी शैलीत असूनही प्रस्तुत कादंबरी भावप्रधान नसून चर्चाप्रधानच आहे.
निनावी नायकाच्या देशी-परदेशी भटकंतीतून लेखकाने कुटुंब - समाज - राजकारण यांचा उभा छेद उभा केला आहे:
त्यातून विविध प्रसंग आणि विविध स्तरांतील पात्रे यांचे दर्शन घडते.
आजच्या वृतान्त कादंबऱ्यांची गंगोत्री म्हणून केतकरांच्या सर्वच कादंबऱ्यांकडे - व - अर्थात - "भटक्या " कडे पाहता येईल!
- डॉ. द. भि. कुलकर्णी
Tags: Bhatkya | भटक्या