• TaoGatha | ताओगाथा

TaoGatha | ताओगाथा

  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-

'ताओगाथा' हा मराठी साहित्यातील एक नवा प्रयोग आहे . अडीच हजार वर्षापासून सार्वकालिक  शहाणपणांच निधान समजलं जाणाऱ्या 'ताओ ते चिंग' या चिनी ग्रंथातील तत्वज्ञान सर्वसामान्य मराठी वाचकांसाठी ही  गाथा  घेऊन आली आहे . 

तिचं वेगळपण तिच्या स्वरुपात आहे . ताओचं जीवनपयोगी तत्वज्ञान, ज्याची मोहिनी मराठी जनमानसावर शेकडो वर्षापासून टिकून आहे अश्या अभंग / ओवी वृतात , सहजपणे समजेल अश्या अर्वाचीन मराठी भाषेत , त्याला परिचित असलेल्या प्रतिमासृष्टीत प्रकट झालं आहे .

ही गाथा  'ताओ ते चिंग' चा अनुवाद नसून अनुसर्जन आहे .आपल्या नकळत या मार्गावरून चालणाऱ्या एका वाटसरूला उमजलेला , भावलेला हा ताओ आहे. हे तत्वज्ञान प्राचीन चीनमध्ये उगम पावलं असलं तरी त्याचं प्राचीन भारतीय  तत्वज्ञानाशी असणारं साम्य 'एकम सत विप्रा बहुधा वदन्ति ...' या सत्याचा प्रत्यय देणारं आहे .     

Write a review

Please login or register to review