Kangalanche Arthashastra | कंगालांचे अर्थशास्त्र

  • ₹160/-

  • Ex Tax: ₹160/-

जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण ही प्रक्रिया सुरू होऊन आता काही काळ लोटला आहे. ह्याचे काही फायदे झाले, त्याचबरोबर काही गंभीर प्रश्‍नही निर्माण झाले. दारिद्य्र, शोषण आणि बेकारी या समस्यांची उपेक्षा होऊ लागली. या देशातील कोट्यवधी कंगालजनांचे अस्तित्त्व नाकारण्याचे प्रयत्न होऊ लागले. 'कंगालांचे अर्थशास्त्र' या पुस्तकात वरील समस्यांची चर्चा केली आहे. अगतिकीकरणापासून जागतिकीकरणापर्यंत, भणंगीकरणापासून विकास व समृद्धीपर्यंत, माहिती-क्रांतिपासून कृषी- आव्हानापर्यंत अशा विविध तीस लेखांद्वारे लेखकाने नव्या आर्थिक प्रश्‍नांचा चिकित्सक परामर्श घेतला आहे. पुस्तकाचे लेखक श्री. हेमन्त देसाई यांचा ह्या विषयाचा व्यासंग दांडगा आहे. महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहसंपादक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. मराठीत खर्‍या अर्थाने त्यांनी आर्थिक पत्रकारितेचे वेगळे पर्व सुरू करून मराठी वाचकांची अर्थशास्त्रीय साक्षरता वाढविण्यासाठी वेगळे प्रयत्न केले. प्रस्तुत पुस्तक हे केवळ अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनाच नव्हे तर, भारताच्या नव्या अर्थव्यवस्थेचा चेहरा तपासून घेण्यात ज्यांना रस आहे, त्यांनाही उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

Write a review

Please login or register to review