Yakshgaan: Kala Aani Abhyas | यक्षगान : कला आणि अभ्यास

  • ₹230/-

  • Ex Tax: ₹230/-

जेव्हा मी इथे यक्षगानाचा लोकरंगभूमीअसा उल्लेख करतो, तेव्हा त्याचा कलात्मक दर्जा कमी असावा असे मला अभिप्रेत नाही. वास्तविक संगीत, नृत्य आणि वेशभूषा हे त्यातील घटक उच्च प्रतीचे तर असतातच आणि खूप मोठी साधना तथा सराव या विना त्यात प्रावीण्य मिळविणे केवळ अशक्य असते.

यक्षगान हे, माझ्या दृष्टीने, भरतनाट्यम् तसेच कर्नाटकी अथवा हिंदुस्तानी संगीताइतकेच शास्त्रीय आहे. राजेरजवाड्यांच्या नव्हे तर जनसामान्यांकडून मिळणार्या प्रचंड प्रोत्साहन प्रतिसादामुळेच इथे लोकही संज्ञा वापरली जाते. सारी रात्र चालणारे हे खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करणार्या खेड्यापाड्यातील लोकांमधूनच यातील कलाकार निर्माण होत असतात.

- डॉ. कोटा शिवराम कारंत

Write a review

Please login or register to review

Tags: Yakshgaan: Kala Aani Abhyas | यक्षगान : कला आणि अभ्यास