Sahityacha Swabhav| साहित्याचा स्वभाव

  • ₹160/-

  • Ex Tax: ₹160/-

प्रा.गो.म.कुलकर्णी यांचा हा अखेरचा समीक्षा-लेखसंग्रह. गो.म. नी जी विपुल स्फुटसमीक्षा लिहिली; ती सर्वच स्फुट असली तरीही कमालीची गंभीर आणि अर्थपूर्ण आहे. वाङ्मयप्रवाहातील अडथळे दूर करण्यास मदत करणे आणि प्रश्नांचे नवे भान निर्माण करणे असे द्विविध स्वरूपाचे मौलिक कार्य गो.म.कुलकर्णी यांच्या समीक्षीने केलेले आहे. रंगनाथ पठारे, पु.शि.रेगे, अरविंद गोखले, कवी बीवि.स.खांडेकर, रा.चिं.ढेरे इत्यादींच्या लेखनाचे महत्त्वमापन करणारे लेख या संग्रहात आहेत. तसेच भावगीत, खंडकाव्यआत्मचरित्र यांसारख्या वाङ्मयप्रकाराबाबत नवचिंतन मांडणारे लेखही आहेत.

गो.म.कुलकर्णी यांचे सारेच समीक्षालेखन मराठी समीक्षेला मार्गदर्शन करणारे अन् सशक्त करणारे आहे. याची साक्ष हा संग्रह देतो.

Write a review

Please login or register to review