Lashkaratil Sevasandhi | लष्करातील सेवा-संधी

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-


अनेक राष्ट्रप्रेमी युवकांना संरक्षण विभागात नोकरी करण्याची इच्छा असते. सैन्यदलात अधिकारी होणे ही अभिमानाची व आदराची गोष्ट आहे. ह्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसंस्थेत अनेक विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन मिळावे व त्यांचा हेतू सफल व्हावा हा ह्या पुस्तकाचा उद्देश आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये संरक्षण क्षेत्रातील भूदल, नौदल, वायुदल, निमलष्करी दल ह्यांबद्दल माहिती दिलेली असून लष्करी सेवेत अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता व पात्रताप्राप्तीचे मार्ग, विविध प्रशिक्षण संस्था, निवडप्रक्रिया, एसएसबीची मुलाखत, अधिकार्‍यांच्या रँक्स व बढती, त्यांना मिळणारे फायदे ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लष्करातील अधिकारी वर्गाबरोबरच सैनिकदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. चारही दलातील सैनिक होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक, शारीरिक व तांत्रिक पात्रता, निवडप्रक्रिया, भरतीची केंद्रे, भरती प्रक्रिया, त्यांच्या रँक्स व बढती, सैनिकांना मिळणारे ङ्गायदे ह्यांबद्दल माहिती दिली आहे. शालेय स्तरापासूनच मुलांना लष्करातील अधिकारी होण्यासाठीची पूर्वतयारी करता यावी ह्यासाठी स्थापन केलेल्या विविध शैक्षणिक संस्था, लष्करी अधिकारी व जवानांबरोबरच मुलकी कर्मचारीदेखील महत्त्वाचे आहेत. ह्या सर्व गोष्टींची माहिती एकत्रित स्वरूपात येथे उपलब्ध करून दिली आहे. रोजगाराबरोबरच देशसेवा करण्याची मनोमन इच्छा आहे अशा सर्व युवकांना व त्यांच्या पालकांना हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल ह्यात शंका नाही.

 

मेजर डॉ. शाम खरात

एम. कॉम., बी. एड., जी.डी.सी. ऍण्ड ए., पीएच.डी.

·         १९९० पासून अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथे अध्यापक

·         २००५ ते २०११ अहमदनगर महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य

·         २०११ नंतर वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक

·         १९९७ पासून राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी

·         राष्ट्रीय छात्रसेनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानिदेशक-राष्ट्रीय छात्र सेनायांचे प्रशंसापदक

Write a review

Please login or register to review