• Brahmankanya | ब्राह्मणकन्या

Brahmankanya | ब्राह्मणकन्या

  • ₹300/-

  • Ex Tax: ₹300/-

डॉ. श्रीधर  व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू  आहे ; मानदंडही  आहे. 
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या  तेहतीस खंडांनी  ज्ञानसागराचे  मंथन  करून  महाराष्ट्राच्या  करतालावर अमृताचा नैवेद्य  ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने  मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या  वेटोळे  घालून  बसलेल्या मराठी  कादंबरीला घनदाट अरण्याचे  रूप  दिले. 
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे  शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी  मोहित  केले 
-

ब्राह्मणकन्या
ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर  व्यंकटेश केतकर यांना कादंबरीक्षेत्रात मनाचे पान मिळवून  देणारी कादंबरी म्हणजे जोडमथळा नसलेली "ब्राह्मणकन्या ". 
या कादंबरीचे आशयसूत्र आहे, 'वेश्यासंततीचे सामाजिक भवितव्य '. अप्पासाहेब, कालिंदी, एसतेर, रामराव, वैजनाथशास्त्री इत्यादी पात्रांच्या माध्यमातून लेखकाने विवाहसंस्था, मातृसत्ताक पद्धती, पितृसत्ताक पद्धती. जातिसंस्था, श्रमिक वर्ग यांच्या संदर्भात भेदक चिंतन प्रकट केले आहे : ते वाचताना आजच्या वाचकास  आयन रॅडच्या "अॅटलास  श्रग्ग्ड" य महाकादंबरीचे स्मरण होईल!!!

- डॉ. द. भि. कुलकर्णी   

Write a review

Please login or register to review

Tags: Brahmankanya | ब्राह्मणकन्या