Paryavaran - Poshak Shauchakup|पर्यावरण-पोषक शौचकूप

  • ₹90/-

  • Ex Tax: ₹90/-

या शौचकूपासाठी पाणीसाठ्याची, भुयारी गटाराची आवश्यकता नाही. मूत्र व शौच स्वतंत्रपणे संकलित करता येते. शौचभांडे टिकाऊ आहे. स्थानिक कारागीर ते तयार करू शकतो. शौचाचे जेथल्यातेथे सोनखतात रूपांतर होते. संकलित मूत्र झाडांना घालावे. शौचकूप दुर्गंधिमुक्त असतो. हा शौचकूप लहान मुलांना, स्त्री-पुरुषांना व वृद्ध, पंगूंनाही आरामात वापरता येतो. घरात, बागेत, गच्चीवर, अनेक मजली इमारतीतील प्रत्येक सदनिकेसाठी व शयनगृहासाठी बांधता येतो. फ्लश शौचकूपाचे रूपांतरही पर्यावरण-पोषक शौचकूपात करता येते. या शौचकूपांमुळे नद्या व समुद्र प्रदूषणमुक्त होतील, तर वातावरण स्वच्छ व आरोग्यदायक राहील.

Write a review

Please login or register to review