Timirbhed |तिमिरभेद

  • ₹400/-

  • Ex Tax: ₹400/-

तिमिरभेदही अरुण चव्हाण यांची कादंबरी म्हणजे एका संवेदनशील तरुणाने जगभरातल्या राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमीवर केलेले भाष्य आहे. कादंबरीतील वास्तव अनेक घटनांचे व पात्रांचे दिग्दर्शन करते. एका संस्थानमधील रीतिरिवाज, संभाषणाची आदब आणि खानदानी वर्तन हे सर्व व याशिवाय अनेक समृद्ध अंगांनी कादंबरी बहरत जाते. शहरातील आश्रयस्थाने, श्रद्धास्थाने, मंदिरे, प्रतिभासंपन्न कलावंत, अभिनेते, कवी, लेखक अशांच्या वास्तव्याने प्रतिष्ठित झालेल्या शहरातील नागरिकांची आत्मप्रतिष्ठा व ताठरपणाही कादंबरीत स्पष्ट होतो. निष्पाप व्यक्तींच्या पदरी येणारे दु:ख, तारुण्यातील बेहोषता, प्रेमभंग अशा मानवी जीवनातील अनेक धाग्यांने गुंफलेली ही कादंबरी म्हणजे एका नगरीचा कलात्म दस्तऐवजच आहे. हेच या कादंबरीचे मोल आहे.

Write a review

Please login or register to review