Oasis|ओअॅसिस

  • ₹100/-

  • Ex Tax: ₹100/-

नयनाचे ओअॅसिसहे एक दीर्घ गद्यकाव्य आहे. मराठीतील गद्यकाव्ये ई.राला, अज्ञाताला, गूढाला उद्देशून लिहिलेली असतात. नयनाची गद्यकाव्ये गूढ आहेत; पण दुर्बोध नाहीत. त्यांच्यात श्रीकृष्ण, गांधी, मादाम, स्वातंत्र्यांदोलन आणि राजकारण यांचे संदर्भ येत असले, तरी त्यांचे सत्त्व स्थल-कालातीत आहे. आणि अनुभव जेव्हा स्थल-कालातीत होतो, तेव्हा तो सहजच लयपूर्ण, सजीव आणि तत्त्वगर्भ होतो. ओअॅसिसया गद्यकाव्यातील तपशील तर कळेलच; पण त्यामागे स्पंदन पावणारे कवयित्रीचे चिंतनशील काव्यात्म अंत:करण जाणवले पाहिजे. गीता, गांधी, मार्क्स, रजनीश यांच्या जीवन-चिंतनाची साक्षी आहे नयना!

- डॉ. द. भि. कुलकर्णी

Write a review

Please login or register to review